नरेंद्र मोदी हे तर ब्रह्मांडनायक : रामदेवबाबा

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

पतंजली आयुर्वेदीक संस्थेमध्ये जवळपास 200 संशोधक वेगवेगळ्या आयुर्वेदीक औषधींवर संशोधन केले जाणार आहे. जवळपास 200 कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेले हे देशातील सर्वात मोठे आयुर्वेदीक संशोधन केंद्र असणार आहे.

हरिद्वार - पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे जगभर देशाचा सन्मान वाढला असून, जगाचे नेतृत्त्व करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. त्यामुळे ते ब्रह्मांडनायक आहेत, असे गौरवोद्गार पतंजली संशोधन संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी योगगुरू रामदेवबाबा यांनी काढले.

हरिद्वार येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पतंजली संशोधन संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्वामी रामदेव म्हणाले, की नरेंद्र मोदी देशाला मिळालेले वरदान आहेत, त्यांचा राष्ट्रसंत म्हणून सन्मान झाला पाहिजे. तर रामदेवबाबा यांनी माझ्यावरील जबाबदारी आणखी वाढवली आहे, असे यावेळी मोदी म्हणाले.

काय आहे पतंजली संशोधन संस्था?
पतंजली आयुर्वेदीक संस्थेमध्ये जवळपास 200 संशोधक वेगवेगळ्या आयुर्वेदीक औषधींवर संशोधन करणार आहेत. जवळपास 200 कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेले हे देशातील सर्वात मोठे आयुर्वेदीक संशोधन केंद्र असणार आहे.