मोदी मला लक्ष्य करत आहेत: केजरीवाल

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 जून 2016

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टॅंकर गैरव्यवहारामध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट निशाणा साधत मी सोनिया किंवा राहुल गांधी नाही. त्यामुळे माझ्यासोबत तुम्ही कोणतीही गुप्त सौदेबाजी करू शकत नाही, असे सांगत कडाडून टीका केली. 
 
केजरीवाल म्हणाले, "आतापर्यंत मोदी सरकारने सोनिया व राहुल गांधी यांच्यावर कोणताही खटला दाखल केला नाही. मात्र, मला ते टार्गेट करत आहे. पण मी बधणार नाही. मोदी सरकार छापे टाकण्याच्या धमक्‍या देऊन खोटे व बनावट खटले दाखल करत भीती घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण मी कुणाला घाबरत नाही,‘‘ असेही केजरीवाल म्हणाले. 

दिल्लीमध्ये कथित टॅंकर गैरव्यवहारात तब्बल 400 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात दिल्लीमधील भ्रष्टाचारविरोधी पथकाने सोमवारी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित व सध्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे. भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमुख एमके मीणा यांनी याप्रकरणी शीला दीक्षित व केजरीवाल या दोघांचीही चौकशी होणार असल्याचे सांगितले. सोमवारी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर केजरीवाल यांनी ट्‌विटरवर मोदींवर कडाडून टीका केली.