मोदीजी भित्रे आहेत : केजरीवाल

वृत्तसंस्था
रविवार, 1 जानेवारी 2017

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या रोहतक येथील सभेत आज (रविवार) एकाने त्यांच्या दिशेने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना केजरीवाल यांनी "मोदीजी भित्रे आहेत' अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या रोहतक येथील सभेत आज (रविवार) एकाने त्यांच्या दिशेने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना केजरीवाल यांनी "मोदीजी भित्रे आहेत' अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

आज केजरीवाल यांची रोहतक येथे सभा होती. यावेळी सभेमध्ये एकाने त्यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. याबाबत केजरीवाल यांनी ट्‌विटरद्वारे म्हटले आहे की, "मी म्हणालो होतो की मोदीजी भित्रे आहेत. आज त्यांनी त्यांच्या चमच्यांमार्फत बूट फेकला. मोदीजी आम्हीही हे करू शकतो, मात्र आमचे संस्कार आणि संस्कृती आम्हाला असे वागण्याची परवानगी देत नाही. तुम्ही वाटेल तर बूट फेका, केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत छापा टाका, मी नोटाबंदीचा गैरव्यवहार, सहारा आणि बिर्लामार्फत घेतलेल्या पैशांचे सत्य सांगत राहणार आहे.'

नववर्षाच्या पूर्वसंध्येला मोदी यांनी देशाला संबोधित केले. मात्र त्यांच्यावर केजरीवाल यानीं तीव्र शब्दांत टीका केली. आज सकाळी ट्विटरद्वारे मोदींवर टीका करताना केजरीवाल म्हणाले, "मोदी यांनी देशाला धोका दिला असून, काळ्या पैशातील एक रूपयाही ते बाहेर काढू शकले नाहीत. मोदींनी आपली विश्‍वासार्हता पूर्णपणे गमाविली आहे.

देश

पणजी : पुणे राष्ट्रीय हरित लवादाकडील गोव्यातील दावे दिल्ली लवादाकडे हलविण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने...

02.06 PM

रायपूर - छत्तीसगड राज्याची राजधानी असलेल्या रायपूर येथील सरकारी रुग्णालयामध्ये...

01.48 PM

नवी दिल्ली : डोकलाम येथे भारत आणि चीन यांच्यादरम्यान निर्माण झालेल्या पेचावर लवकर तोडगा निघेल. चीन याबाबत सकारात्मक पाऊल उचलेल,...

01.15 PM