भाजपमध्ये प्रवेश म्हणजे देशभक्ती : तेजस्वी यादव

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

पाटना (बिहार) : देशातील पाच राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर विविध राज्यातील नेते, कार्यकर्ते पक्षांतर करत आहेत. या संदर्भात बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत भाजपमध्ये प्रवेश म्हणजे देशभक्ती असल्याची टीका केली आहे.

भारतीय जनता पक्षाने आज गोव्यातील पहिली यादी प्रसिद्ध केली. त्यामध्ये कॉंग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले उमेदवार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यापैकी काही उमेदवारांवर दोन महिन्यांपूर्वीच भाजपने गैरव्यवहाराचे आरोप केले होते, असा दावा करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर तेजस्वी यादव यांनी ट्‌विटरद्वारे भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'भारतीय जनता पक्षाचे बहुतेक खासदार हे कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले आहेत. ज्या क्षणी एखादा व्यक्ती पवित्र भाजपमध्ये प्रवेश करतो. त्याक्षणी त्याला किंवा तिला प्रामाणिक, हिंदू, देशभक्ती यांचे प्रमाणपत्र दिले जाते आणि मोक्षही मिळतो.'

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी आज गोव्यातील 29 उमेदवारांचा समावेश असलेली यादी प्रसिद्ध केली. त्यापैकी 29 उमेदवार हे विद्यमान आमदार आहेत. भाजपने पंजाबमधील 17 उमेदवारांचा समावेश असलेली यादीही आज प्रसिद्ध केली आहे. त्यापैकी पाच उमेदवार विद्यमान आमदार आहेत.

Web Title: The moment one joins Holy BJP, He/she becomes certified Honest, Hindu, Patriotic & gets salvation