संपूर्ण केरळमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 जून 2018

नैर्ऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण केरळमध्ये सक्रिय झाला असून, राज्याच्या दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. राज्यात पुढील पाच दिवस अशाच प्रकारे पाऊस सक्रिय राहील, अशी माहिती तिरुअनंतपुरमच्या हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के. संतोष यांनी सांगितले.

तिरुअनंतपुरम - नैर्ऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण केरळमध्ये सक्रिय झाला असून, राज्याच्या दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. राज्यात पुढील पाच दिवस अशाच प्रकारे पाऊस सक्रिय राहील, अशी माहिती तिरुअनंतपुरमच्या हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के. संतोष यांनी सांगितले. 

आज दुपारी 2 पासून आगामी चोवीस तासात केरळ आणि लक्षद्वीपच्या किनारपट्टीवर ताशी 50 कि.मी. प्रतितास वारे वाहण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली असून, मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी साडेआठपर्यंत तिरुअनंतपुरम येथे 45.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, तर विमानतळ परिसरात 35.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मात्र या पावसाचा विमानसेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे विमानतळ संचालकांनी सांगितले. कोची विमानतळावर 51.8 मि.मी. तर कन्नूर येथे 30.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 

Web Title: Monsoon 2018 to cover entire Kerala