मॉन्सून आला रे! केरळच्या किनारपट्टीवर दाखल

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 मे 2017

बंगाल उपसागरामध्ये रविवारी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. त्याचे रूपांतर सोमवारी मोरा चक्रीवादळात झाले. चक्रीवादळ भारतातील मॉन्सूनसाठी अनुकूल असते. हे चक्रीवादळ मोठ्या प्रमाणात बाष्प त्याच्या बरोबर घेऊन जाते.

पुणे - बंगाल उपसागराच्या मध्य पूर्व भागात कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर सोमवारी चक्रीवादळात झाल्याने आज (मंगळवार) सकाळी दोन दिवस आगोदर मॉन्सूनचे केरळ किनारपट्टीवर आगमन झाले. 

बंगालच्या उपसागरात घोंगावणारे मोरा हे चक्रीवादळ आज बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकले. त्यामुळे नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या (मॉन्सून) पुढील प्रवासाला गती मिळाली. पुढील चोवीस तासांमध्ये मॉन्सून केरळमध्ये बरसेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार आज सकाळी केरळच्या दक्षिण किनारपट्टीवर मॉन्सून दाखल झाला आहे. दोन दिवस आगोदरच यंदा मॉन्सून भारतात आला आहे.

बंगाल उपसागरामध्ये रविवारी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. त्याचे रूपांतर सोमवारी मोरा चक्रीवादळात झाले. चक्रीवादळ भारतातील मॉन्सूनसाठी अनुकूल असते. हे चक्रीवादळ मोठ्या प्रमाणात बाष्प त्याच्या बरोबर घेऊन जाते. या दरम्यान, अरबी समुद्रात मॉन्सूनला पुढे सरकरण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली. श्रीलंकेमध्ये मॉन्सूनने चांगली प्रगती केली आहे. 

राज्यात वळवाच्या पावसाची शक्‍यता
कोकण-गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पुढील चोवीस तासांमध्ये वळवाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. विदर्भात मंगळवारी सोसाट्याचा वारा वाहणार असून, ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
'मोरा' चक्रीवादळाची बांगलादेशला धडक

गायक अभिजितचे ट्विटर अकाऊंट पुन्हा 'सस्पेंड'
यूपीत मंत्र्यांकडून बारचे उद्घाटन; योगींनी मागितले स्पष्टीकरण
एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये २१ बालकांना नवसंजीवनी
लग्नानंतर फ्रीज, सोन्याची साखळी मागणाऱ्या पतीला अटक
हौसला बुलंद हो, तो क्या कॅन्सर, क्या दसवीं!
आपल्यासाठी देश प्रथम हवा: नौदल प्रमुख लांबा​
शिवस्मारकाच्या टेंडरला वाढीव रकमेचे वळण!