संघाच्या कार्यक्रमातील मुखर्जींचा 'तो' फोटो व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

पुणेः भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोप सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमामधील छायाचित्रामध्ये छेडछाड करण्यात आली असून, मुखर्जी हे संघाच्या पद्धतीने प्रणाम करतानाचे छायाचित्र सोशल मिडियावर व्हॉयरल झाले आहे.

पुणेः भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोप सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमामधील छायाचित्रामध्ये छेडछाड करण्यात आली असून, मुखर्जी हे संघाच्या पद्धतीने प्रणाम करतानाचे छायाचित्र सोशल मिडियावर व्हॉयरल झाले आहे.

रा. स्व. संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर मुखर्जी यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान संघाच्या वतीने ध्वजाला प्रमाण करण्यात आला होता. व्यासपीठावरील मान्यवरांनी प्रणाम केले होते. परंतु, मुखर्जी हे फक्त उभे होते. परंतु, मुळ छायाचित्रामध्ये छेडछाड करण्यात आली असून, मुखर्जी यांनी संघाची टोपी घालून प्रणाम करतानाचे छायाचित्र व्हॉयरल झाले आहे. प्रणब मुखर्जी यांच्या कन्या व दिल्ली काँग्रेसच्या प्रवक्त्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी याबाबत ट्वीटरवरून नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, कट्टरता, धर्म किंवा असहिष्णुतेच्या माध्यमातून या राष्ट्राची व्याख्या करण्याचा प्रयत्न केल्यास देश म्हणून असलेले आपले अस्तित्वच धोक्‍यात येईल, असा इशारा देत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी (ता. 7) नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावरून राष्ट्रवादाचे बौद्धिक घेतले. मुखर्जी यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारल्यानंतर काँग्रेसने त्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. यामुळे त्यांच्या भाषणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. मात्र, राजकारणात अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या मुखर्जी यांनी संघाचे कौतुक किंवा टीकाटिप्पणी न करता राष्ट्रवाद आणि देशभक्ती या विषयांवर भाष्य केले. विविध मुद्द्यांवर व्यक्त होणाऱ्या हिंसक संतापामुळे सामाजिक परिस्थिती बिघडत आहे. त्यामुळे भय आणि अविश्‍वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीतून संवादाचे सर्व मार्ग अनुसरून देशाला बाहेर काढले, तरच संपूर्ण समाज लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकेल, असे ते म्हणाले.

Web Title: Morphed picture of Pranab Mukherjee giving RSS-style salute goes viral