'अखिलेशच्या विरोधात सावत्रआईच्या कुरघोड्या'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली- समाजवादी पक्ष आणि मुलायमसिंह यादव यांच्या परिवारातील वादाच्या दरम्यान आता आमदार उदयवीरसिंह यांनी खळबळजनक विधान केले आहे. अखिलेश यादव यांना पक्ष आणि कुटुंबात निर्माण होत असलेल्या अडचणींच्या मागे मुलायमसिंह यांची दुसऱ्या पत्नीचा हात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

उदयवीरसिंह हे विधान परिषदेचे सदस्य असून ते अखिलेश यांचे समर्थक आहेत. एका इंग्रजी दैनिकाने याबाबतचे वृत्त दिले आहे. उदयवीर यांनी मुलायसिंह यांचे भाऊ शिवपाल यांच्यावरही आरोप केले आहेत. मुलायमसिंह यांची दुसरी पत्नी म्हणजेच अखिलेश यांच्या सावत्र आईला राजकारणात पुढे आणण्याचा प्रयत्न शिवपाल हे करीत आहेत. त्यामुळे मुलायम यांनी त्यांच्या मोठ्या मुलाविरुद्ध होणाऱ्या कारस्थानांबद्दल सावध राहायला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

ईटा-मैनपुरी येथील आमदार असलेल्या उदयवीर यांनी चार पानी चिट्ठी लिहिली आहे. अखिलेश यांच्यासाठी लक्ष घालण्याबाबत प्रथमच मुलायमसिंह यांना त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने असे पत्र लिहिले आहे.