पुष्कर यांच्या मृत्यूचे गूढ 

Mystery of Pushkar's death
Mystery of Pushkar's death

नवी दिल्ली - परराष्ट्र व्यवहार विषयातील तज्ज्ञ आणि केंद्रात कॉंग्रेसच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूनंतर चार वर्षांनी दिल्लीतील पतियाळा हाउस न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आरोपपत्र दाखल केले आहे. थरूर यांचे पाकिस्तानातील महिला पत्रकार मेहेर तरारशी विवाहबाह्य संबंधातून पुष्कर यांचा मृत्यू झाला, असा आरोप आहे. सुनंदा यांचा संशयास्पद मृत्यू आणि तपास प्रक्रियेविषयीचा घटनाक्रम - 

- 16 जानेवारी 2014 - शशी थरूर यांच्याशी कथित संबंधाच्या आरोपावरून सुनंदा पुष्कर आणि पाकिस्तानी पत्रकार मेहेर तरार यांच्यात ट्‌विटरयुद्ध 
- 17 जानेवारी 2014 - सुनंदा पुष्कर संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत दिल्लीतील हॉटेल लीलाच्या 345 क्रमांकाच्या सूटमध्ये आढळल्या 
- 19 जानेवारी 2014 - पुष्कर यांच्या शरीरावर डझनभर खुणा, गालावर ओरखडे, डाव्या हाताच्या पंजावर दातांच्या खोलवर जखमा असल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट 
- 21 जानेवारी 2014 - विषप्रयोगाने पुष्कर यांचा मृत्यू झाल्याचा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या अहवालात नमूद 
- 23 जानेवारी 2014 - तपासकर्त्यांनी प्राथमिकदृष्ट्या, पुष्कर यांचा अंतःस्थ विषाने मृत्यू झाल्याचे नोंदवताना, त्यांच्या शरीरात अल्प्रोझोलेम आणि एक्‍सीड्रीनचे अंश आढळल्याचे नोंदवले 
- 2 जुलै 2014 - "एम्स'मधील शवचिकित्सा करणाऱ्या डॉ. सुधीर गुप्ता यांनी "दबावाखाली अहवाल तयार केला,' असे सांगत केंद्रीय प्रशासकीय लवादाकडे (कॅट) प्रतिज्ञापत्र देऊन, "केस मिटवण्यासाठी छापील पद्धतीने अहवालाला भाग पाडले,' असे नोंदवले. 
- 6 जानेवारी 2015 - दिल्लीचे पोलिस आयुक्त बी. एस. बासींकडून पुष्कर यांचा खून झाल्याचा गौप्यस्फोट 
- 10 नोव्हेंबर 2015 - अमेरिकेतील फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनकडून (एफबीआय) दिल्ली पोलिसांना व्हिसेराचा अहवाल. पुष्कर यांच्या व्हिसेरातील किरणोत्सार विहीत प्रमाणात आहे, त्यामुळे मृत्यू झाला, असे म्हणता येत नाही, असे नमूद 
- मार्च 2016 - मेहेर तरार दिल्लीत, पुष्कर यांच्या खुनाबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. 
- 14 मे 2018 - सुनंदा यांना आत्महत्येस सहकार्य केल्याबद्दल, तसेच पत्नीस क्रूर वर्तन केल्याबद्दल थरूर यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र 
- 5 जून 2018 - सुनंदा यांच्या मृत्यूच्या घटनेसंदर्भात दाखल केलेल्या आरोपपत्रानंतर पती थरूर यांनी 7 जुलै रोजी न्यायालयात हजर राहावे, अशी न्यायालयाची सूचना. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com