काश्‍मीरच्या परिस्थितीला नेहरूंची धोरणे कारणीभूत - नायडू

वृत्तसंस्था
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली - काश्‍मीरसंदर्भात सध्या ज्या काही समस्या आहेत, त्याला भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची धोरणे कारणीभूत असल्याची टीका केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी केली आहे.

नवी दिल्ली - काश्‍मीरसंदर्भात सध्या ज्या काही समस्या आहेत, त्याला भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची धोरणे कारणीभूत असल्याची टीका केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी केली आहे.

माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी काश्‍मीरमधील वर्तमान परिस्थिती राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका केली होती. त्या टीकेस उत्तर देताना नायडू म्हणाले, "चिदंबरम यांनी बेजबाबदार आणि अपरिपक्व विधान केले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे देशहिताला बाधा पोचत असून त्यांचे वक्तव्य देशविरोधाच्या जवळपास जाणारे आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे चिदंबरम यांच्या वक्तव्याला समर्थन आहे किंवा नाही हे पक्षाने स्पष्ट करावे. ते काश्‍मीरविरूद्ध बोलत आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की काश्‍मीर हे भाजप सरकारने किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेले नाही.'

"नेहरूजी पंतप्रधान होते त्यावेळी घेतलेल्या काही चुकीच्या धोरणांमुळे काश्‍मीरमध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत. काँग्रेस कित्येक वर्षे सत्तेत होते. गेली दहा वर्षेही त्यांचेच राज्य होते. त्यांनी काय केले? आता त्यांची सत्ता गेली आहे आणि ते घाणेरडे राजकारण करत आहेत', अशी टीकाही नायडू यांनी यावेळी बोलताना केली.