खुर्चीसाठी उत्तराखंड खड्ड्यात घातला- मोदी

वृत्तसंस्था
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

रुद्रपूर : विकासापेक्षा खुर्चीत जास्त रस असलेल्यांनी उत्तराखंडला अशा खड्ड्यात नेऊन ठेवले आहे जिथे विकास आणण्यासाठी दोन दोन इंजिनांची गरज पडेल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. आज उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे झालेल्या निवडणूक सभेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी कॉंग्रेस आणि हरीश रावत सरकारवर कडाडून टीका केली.

देवभूमीच्या विकासासाठी भाजपला एक संधी द्या, असे सांगत त्यांनी उत्तराखंडच्या सर्व समस्यांवर विकास हाच एक उपाय असल्याचे या वेळी सांगितले. उत्तराखंडमध्ये पर्यटनाच्या भरपूर संधी आहेत, भारतातील सर्व लोकांना चारधाम यात्रा करण्याची इच्छा असते. याद्वारे राज्यात उद्योग वाढले, तर विकास होईल तसेच केंद्रासोबतच राज्यातही भाजप सरकार असेल तर हा विकास वेगात होईल, असेही ते म्हणाले.

आमचे सरकार हे शेतकरी, गरीब आणि युवांचे हितचिंतक असून, आम्ही युवांना रोजगार, गरिबांना घर देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे पंतप्रधान या वेळी म्हणाले, तसेच उत्तराखंडमध्ये माजी सैनिकांची संख्या जास्त असून, त्यांची "वन रॅंक वन पेंशन'ची मागणी आम्ही तब्बल 40 वर्षांनी पूर्ण केल्याचा उल्लेखही मोदींनी या वेळी केला.