स्वच्छतेच्या सुविधेत आणखी सुधारणा करणार : पंतप्रधान

Narendra Modi
Narendra Modi

नवी दिल्ली : जागतिक शौचालय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशामध्ये स्वच्छतेत आणखी सुधारणा करण्याचे वचन दिले आहे. ''या जागतिक शौचालय दिनी आम्ही देशातील स्वच्छतेच्या दृष्टीने विविध आवश्यक सुविधेत वाढ करण्यासाठी कटिबद्ध आहोत. यासाठी आता आम्ही पु्न्हा एकदा निश्चय करत आहोत''. 

पंतप्रधान मोदींनी 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या निमित्ताने देशात 'स्वच्छता दिवस' म्हणून साजरा करण्याचे आवाहन देशवासियांना केले. तसेच त्यांनी स्वच्छतेच्या या मोहीमेत देशवासियांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला देशातील विविध भागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर आता जागतिक शौचालय दिनानिमित्त पंतप्रधानांनी देशातील स्वच्छतेत सुधारणा करण्याचे वचन दिले आहे.

''मी भारतातील विविध भागांमध्ये शौचालयांसाठी काम करणाऱ्या सर्व नागरिक आणि संस्थांची प्रशंसा करतो. त्यांच्या अमूल्य योगदानामुळे 'स्वच्छ भारत' अभियानास विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे", असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

दरम्यान, जागतिक शौचालय संस्थेने 2001 साली 'जागतिक शौचालय दिना'ची स्थापना केली होती. यासाठी 2013 साली संयुक्त राष्ट्र संघाने याबाबतचा ठरावही पारित केला होता. त्यामुळे हा दिवस 'जागतिक शौचालय दिवस' म्हणून साजरा केला जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com