मोदींनी सोमनाथ मंदिरात केली पूजा

वृत्तसंस्था
बुधवार, 8 मार्च 2017

गुजरातमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदींच्या या गुजरात दौऱ्याकडे पाहिले जात आहे. उत्तर प्रदेशातील प्रचार संपुष्टात येताच मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर गेले होते.

अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) सकाळी सोमनाथ मंदिरात जाऊन पूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व केशूभाई पटेल उपस्थित होते.

गेल्या दोन दिवसांपासून पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर आहेत. आज सकाळी मोदींनी पहिल्या ज्योतिर्लिंगचे दर्शन पूजा केली. सोमनाथ मंदिरात दर्शन घेत त्यांनी सोमनाथ ट्रस्टमधील ट्रस्टींसोबतच्या बैठकीत सहभागी झाले होते. सोमनाथ मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांमधील पहिले ज्योतिर्लिंग आहे.

गुजरातमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदींच्या या गुजरात दौऱ्याकडे पाहिले जात आहे. उत्तर प्रदेशातील प्रचार संपुष्टात येताच मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर गेले होते. गांधीनगर येथील महात्मा मंदिरात महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व महिला सरपंचांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला मोदी संबोधित करणार आहेत. पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर मोदींचा हा दहावा गुजरात दौरा आहे.