राहुल गांधीच्या 'रोड शो'त आगीचा भडका

Narrow escape for Rahul Gandhi as balloons catch fire during roadshow
Narrow escape for Rahul Gandhi as balloons catch fire during roadshow

नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या रोड शोमध्ये गॅसच्या फुग्यांमुळे आगीचा भडका उडाला. आग न भडकल्यामुळे सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही. राहुल सध्या मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. निवडणुक प्रचारासाठी राहुल यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ही घटना घडली आहे.

ही घटना राहुल गांधीपासून काही अंतरावरच घडली. शनिवारी (ता.06) जबलपूरमधील 'रोड शो'दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल यांच्या स्वागतासाठी आरतीची तयारी केली होती. याच दरम्यान या भागातील शास्त्री ब्रिज परिसरात गॅसने भरलेले फुगेही होते. आरतीचं ताट गॅसच्या फुग्यांच्या संपर्कात आल्यामुळे लहानसा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. काही वेळासाठी सर्वजण स्तब्ध झाले. पोलिसांनी तातडीने याकडे लक्ष देते नियंत्रण मिळवले.

दरम्यान, राहुल निवडणुक प्रचारासाठी जबलपूरला 8 कि.मीचा रोड शो केला. यादरम्यान ही घटना घडली. तसेच, पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांची काल (ता.06) निवडणुक आयोगाने घोषणा केली असून मध्य प्रदेश, मिझोराम, राजस्थान, तेलंगणा, आणि छत्तीसगड या चार राज्यामध्ये निवडणुका होणार आहेत. राहुल या निवडणुकांच्या प्रचार कार्यक्रमामध्ये व्यस्त आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com