नाशिकमध्ये दलितांवर पोलिसांकडून अत्याचार - प्रकाश आंबेडकर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - नाशिक जिल्ह्यात नुकत्याच उसळलेल्या दंगलीच्या वेळी पोलिसांनी "कॉंबिंग ऑपरेशन'च्या नावाखाली दलित समाजावरच अत्याचार केले, असा आरोप करताना भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गृहखाते स्वतःकडे ठेवलेल्या मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्षपणे नेम धरला.

दिल्लीत आज पत्रकाराशी बोलताना आंबेडकर म्हणाले, की नाशिक परिसरात उसळलेल्या दंगलीत पोलिसांनी दलितांवरच अत्याचार केले आहेत. आपण लवकरच त्य ठिकाणी जाऊन अत्याचारग्रस्त दलित बांधवांची भेट घेणार आहोत. "कॉंबिंग ऑपरेशन'च्या नावाखाली दलितांवर पोलिसच अत्याचार करत असतील तर ती बाब भयावह आहे. राज्य पोलिस दलातील धर्मनिरपेक्षतेची परंपरा कायम राहील याकडे लक्ष देणे आवश्‍यक असल्याचे ते म्हणाले.
बलात्कार करणाऱ्यांमध्ये असलेली विकृती नष्ट करण्यासाठी पुन्हा एकदा सामाजिक जागर करण्याची गरज आंबेडकर यांनी बोलून दाखविली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याबाबत महाराष्ट्रालाच नव्हे, तर देशालाही पूर्वीच मार्ग दाखवून ठेवल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, की राज्यात जातीय तेढ वाढत जात असून, हे चांगले लक्षण नाही.

देश

गंगटोक - कैलास मानसरोवर यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना प्रवेश नाकारल्यामुळे अनेक यात्रेकरू माघारी परतले असून, यामुळे चीनचा...

03.03 AM

पुरी (ओडिशा) - येथील प्रसिद्ध जगन्नाथ यात्रेला आजपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. पाऊस, वाऱ्याची तमा न बाळगता देश-परदेशातील...

03.03 AM

श्रीनगर - श्रीनगरच्या बाहेर सुरक्षा दले आणि दहशतवादी यांच्यात सुरू झालेली चकमक आज तब्बल चौदा तासांनी सायंकाळी सहाच्या सुमारास...

02.03 AM