शाळेत राष्ट्रगीतास परवानगी न देणाऱयाला अटक

वृत्तसंस्था
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

अलाहाबाद- शाळेला स्वातंत्र्यदिनी राष्ट्रगीत म्हणण्यास परवानगी न दिल्याने पोलिसांनी शाळेच्या व्यवस्थापकाला अटक केली. त्यापूर्वी परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने शाळेला सीलबंद करण्यात आले आहे.

झिया उल हक असे अटक केलेल्याचे नाव असून, एम. ए. कॉन्व्हेंट स्कूलचे ते व्यवस्थापक आहेत. त्यांच्यावर राष्ट्रसन्मान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले. "राष्ट्रगीतातील भारत भाग्य विधाता‘च्या "भारत‘ या शब्दाला आमचा आक्षेप आहे. भारत आमचा भाग्यविधाता कसा होऊ शकतो? आमचा भाग्यविधाता तर फक्त ईश्वरच आहे. त्यामुळे आम्ही शाळेत राष्ट्रगीत गायनाची परवानगी देऊ शकत नाही. हे आमच्या मुस्लिम धर्माच्या विरोधात आहे,‘ असे झिया यांचे म्हणणे आहे.