योगी आदित्यनाथ अयोध्येत; 'जय श्रीराम'च्या घोषणा

वृत्तसंस्था
बुधवार, 31 मे 2017

अयोध्येत दाखल झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी सर्वप्रथम हनुमानगढी येथे जाऊन दर्शन घेतले आणि पूजा केली. त्यानंतर त्यांनी रामललाचे दर्शन घेतले. आदित्यनाथ यांच्या स्वागतासाठी शहरात सगळीकडे पोस्टर्स झळकत आहेत.

अयोध्या - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (बुधवार) सकाळी अयोध्या येथे जाऊन रामजन्मभूमीचे दर्शन घेतले. यावेळी 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यात आल्या.

अयोध्येतील 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर याठिकाणी जाणारे योगी आदित्यनाथ हे दुसरे मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी 2002 मध्ये राजनाथसिंह मुख्यमंत्री असताना अयोध्यात गेले होते. आज सकाळी आदित्यनाथ अयोध्येत दाखल झाले असून, दिवसभर येथेच असणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच अयोध्येत आले आहेत.

अयोध्येत दाखल झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी सर्वप्रथम हनुमानगढी येथे जाऊन दर्शन घेतले आणि पूजा केली. त्यानंतर त्यांनी रामललाचे दर्शन घेतले. आदित्यनाथ यांच्या स्वागतासाठी शहरात सगळीकडे पोस्टर्स झळकत आहेत. आज दुपारी ते अवध विश्वविद्यालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर शरयू नदीच्या किनारी जाऊन पूजा करणार आहेत.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
काबूलमध्ये भारतीय दुतावासाजवळ स्फोट
मॉन्सून 8 जूनला मुंबईत: हवामान विभाग​
लोकांनी काय खावे हे सरकार ठरवत नाही: केंद्रीय मंत्री
बीफ फेस्टिव्हलवरून विद्यार्थ्याला मारहाण​
मुख्यमंत्र्यांचा शेट्टी, जयंतरावांवर नेम; सदाभाऊंची ढाल​
दिल्ली आयआयटीतील विद्यार्थीनीची आत्महत्या

जनावरे विक्री बंदीबाबत दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सूट शक्‍य
शेतकरी संपावर काहीही साध्य होणार नाही : माधव भंडारी
#स्पर्धापरीक्षा - बलुचिस्तान