गुजरातमध्ये स्मृती इराणींच्या दिशेने फेकल्या बांगड्या

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जून 2017

अमरेली जिल्ह्यातील मोटा भंडारिया गावच्या 20 वर्सीय केतन कासवाला याने इराणी यांच्या दिशेने बांगड्या फेकल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही घटना घडली.

अहमदाबाद - गुजरातमधील अमरेली शहरात सोमवारी एका कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या दिशेने एका व्यक्तीने बांगड्या फेकल्याची घटना घडली आहे. या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरेली जिल्ह्यातील मोटा भंडारिया गावच्या 20 वर्सीय केतन कासवाला याने इराणी यांच्या दिशेने बांगड्या फेकल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही घटना घडली. स्मृती इराणी बोलत असताना कासवाला याने त्यांच्या दिशेने बांगड्या फेकल्या आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या.

या प्रकरणी काँग्रेसने म्हटले आहे, की कासवाला याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी असे आंदोलन केले. इराणी यांना कासवाला याला कार्यक्रमात सहभागी होण्याचे आणि बांगड्या फेकू देण्यास पोलिसांनी सांगितले. तसेच त्यांनी या बांगड्या मी त्याच्या पत्नीला भेट देईल असेही सांगितले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
'होय, मी फक्‍त शेतकरीच आहे'...!
#स्पर्धापरीक्षा - 'झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट' योजना​
धुळे: लोकसहभागातून घटबारी धरणाचे काम प्रगतीपथावर​
डोंगरावर फुलविले आमराईचे नंदनवन​
आई-वडिलांच्या प्रश्‍नाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या​
श्रीलंकेच्या चुकांमुळे पाक उपांत्य फेरीत​