राहुल केवळ हिंदूच नाही, तर जानवेधारी हिंदू: सुरजेवाला

Rahul Gandhi
Rahul Gandhi

अहमदाबाद : प्रसिद्ध सोमनाथ मंदिरास आज भेट देणाऱ्या कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव मंदिरातील नोंदवहीत "बिगर हिंदू' गटात नोंदविण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपने राहुल गांधी यांच्या हिंदू असण्यावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्यानंतर कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या वादामध्ये आणखी तेल ओतले. राहुल केवळ हिंदूच नाही, तर जानवेधारी हिंदू असल्याचे वक्तव्य त्यांनी केल्याने पुन्हा हा वाद चिघळला आहे.

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीसाठी राहुल यांनी सॉफ्ट हिंदुत्वाचा अंगीकार केला असून, मागील काही दिवसांपासून ते विविध मंदिरांना भेटी देत आहेत. 

राहुल यांचे आजचे सोमनाथदर्शन वादाच्या भोवऱ्यात अडकले. त्यांचे नाव "बिगर हिंदू' भाविकांच्या यादीमध्ये नोंदले गेल्यानंतर कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष आमने सामने आले. राहुल यांनी "बिगर हिंदू'साठीच्या रजिस्टरमध्ये स्वाक्षरीच केली नव्हती, असा दावा दीपेंद्र हुडा यांनी केला असून, याच रजिस्टरमध्ये राहुल हे आपले नाव राहुल गांधीजी असे का लिहितील, असा सवालही त्यांनी केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अहमद पटेल आणि कॉंग्रेसचे माध्यम समन्वयक मनोज त्यागी यांनी या भाविकांच्या नोंदवहीत नोंदणी केली होती. 

भाजपने एवढ्या हलक्‍या पातळीवर जाऊन राजकारण करू नये. राहुल यांना द्वारकाधीशांचे दर्शन घेण्यासही भाजप हरकत घेतो. माध्यमांमधील काही लोकांचा वापर करत बनावट नोंदवहीचे छायाचित्र व्हायरल करण्यात आले आहे. राहुल यांनी आतापर्यंत हिंदू धर्माचेच पालन केले आहे. 
- रणदीप सुरजेवाला, प्रवक्‍ते कॉंग्रेस 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com