महाराष्ट्रीय सुनील देवधरांनी त्रिपुरात फुलविले भाजपचे कमळ

Sunil Deodhar
Sunil Deodhar

मुंबई : 'सुनीलजी, आपसे हमे यहां जीत चाहिए,' असे सुनील देवधर यांना थेट सांगितले होते ते त्या वेळचे गुजरातचे मुख्यमंत्री आणि आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. देवधर यांना जबाबदारी दिली होती ती गुजरातमध्ये दमोह जिल्ह्याची. हा जिल्हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणूनच समजला जात होता. 2013 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत सुनील देवधर यांनी किमया केली आणि तिथे 3-3 अशी परिस्थिती निर्माण झाली. त्या जिल्ह्यात कॉंग्रेसला भाजपने आव्हान, तर दिलेच पण दणदणीत विजयही मिळवला. तेच सुनील देवधर आज त्रिुपरातल्या भाजप विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. 

डाव्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचे कमळ फुलवणे हे खरेतर स्वप्नच; पण सुनील देवधर यांनी ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. त्रिपुरातील भाजपचा विजय हा सुनील देवधर आणि त्यांच्या चमूची किमया आहे. देवधर गेली 12 वर्षे ईशान्य भारतात काम करत आहेत. मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असलेल्या देवधर यांनी आपल्या नियोजबद्ध धोरण आणि संघटनात्मक बांधणीच्या बळावर त्रिपुरा भगवा केला आहे. 

गुजरातमधील दमोह जिल्ह्यातल्या कामगिरीनंतर देवधर यांच्यावर वाराणसी मतदारसंघाची जबाबदारी सोपवली होती. तिथे विभागप्रमुख म्हणून काम केल्यावर त्यांना त्रिपुरात पाठवण्यात आले. त्रिपुरात भाजपचे तशा अर्थाने फारसे कामच नव्हते; पण देवधर यांनी संघाच्या पद्धतीने तिथे कामाला सुरवात केली. त्यांनी मुळापासून काम करून तिथल्या लोकसंख्येत महत्त्वाचा वाटा असलेल्या इतर मागसासवर्ग समूहाला (ओबीसी) एकत्र केले आणि भारतीय जनता पक्षाचे जाळे निर्माण केले. परिवारातल्या असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांच्या हाकेला ओ देऊन तिथे धाव घेतली. देवधर यांनी या लढाईला वैचारिक संघर्षाचे रूप देऊन त्रिपुरातील माणिक सरकारविरोधात तिथे मोठी जनजागृती केली. 

पुण्यातील तरुणांचा सहभाग 
दिनेश कांजी या पत्रकाराच्या मदतीने त्यांनी माणिक सरकारविरोधात पुस्तकही लिहून घेतले. देवधर यांच्या चमूत पुण्यातील तरुणांचा सहभाग मोठा आहे; तसेच देवधर यांनी गावपातळीपर्यंत केलेली बांधणी लक्षात घेऊन मोदी-शहा यांनीदेखील त्रिपुरात सभांचा धडाका लावला. मतदानानंतरच्या चाचण्यांपूर्वीच देवधर यांनी त्रिपुराचा लाल रंग भगवा होणार, हे स्पष्ट केले होते. हा वैचारिक विजय असल्याची प्रतिक्रिया देऊन ते मोकळेही झाले होते. ज्येष्ठ दिवंगत पत्रकार वि. ना. देवधर यांचे चिरंजीव असलेले पक्के मराठी सुनील देवधर आज भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरबारातले महत्त्वाचे मोहरे ठरले आहेत हे नक्की. पुण्यातला अद्वैत कुलकर्णी, बारामतीचा सुमंत कोकरे; तसेच श्रावण झा त्याची पत्नी वर्षदा, पराग हा कट्टर संघस्वयंसेवक आणि शिवानंद नाडकर्णी, अजित माळी हे काही सदस्य सुनील देवधरांच्या चमूतील. तसा देवधरांचा चमू बराच मोठा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com