नवज्योतसिंह सिद्धू यांची राजकारणातील दिशा चुकली : भाजप

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

बंगळूर : भारतीय जनता पक्षातून बाहेर पडलेले नवज्योतसिंह सिद्धू हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर सिद्धू यांची राजकारणातील दिशा चुकली असल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे.

बंगळूर : भारतीय जनता पक्षातून बाहेर पडलेले नवज्योतसिंह सिद्धू हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर सिद्धू यांची राजकारणातील दिशा चुकली असल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय जनता पक्षाचे नेते एस. प्रकाश म्हणाले, 'नवज्योतसिंह सिद्धू यांना राजकारणात मोठी प्रतिष्ठा होती. मात्र त्यांची राजकारणातील दिशा चुकली आहे. त्यांना आधी एका आणि नंतर दुसऱ्या पक्षाकडून आशा वाटत आहेत. आता त्यांना काँग्रेस जवळचा वाटत आहे.' भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर सिद्धू आम आदमी पक्षात प्रवेश करण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, पंजाब विधानसभा निवडणुकांची कार्यक्रमपत्रिका जाहीर झाल्यानंतर आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. अमृतसर मतदारसंघाचे तिकिट आणि काँग्रेसने निवडणूक जिंकली तर उपमुख्यमंत्रीपद अशा दोन मागण्यावर सिद्ध आणि काँग्रेसमध्ये चर्चा झाली असून सिद्धूच्या मागण्या मान्य केल्याचे वृत्त आहे.

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पंजाबमधील पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, असे संकेत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी एका सभेत बोलताना दिले आहेत. "तुम्ही ज्यावेळी मतदान कराल, त्यावेळी अरविंद केजरीवाल हेच पंजाबचे मुख्यमंत्री असतील असे गृहित धरूनच मतदान करा', असे वक्तव्य सिसोदिया यांनी मोहाली येथील एका जाहीर सभेत केले आहे.