नौदलामध्ये 'डीएसआरव्ही' दाखल 

नौदलामध्ये 'डीएसआरव्ही' दाखल 

नवी दिल्ली : खोल समुद्रात बचावकार्य राबविण्याची क्षमता असलेले पहिलेच वाहन (डीएसआरव्ही) नौदलात आज अधिकृतरीत्या दाखल झाले. भारतीय नौदलातील अशा प्रकारचे हे पहिलेच वाहन असून, यामुळे नौदलाची कार्यक्षमता वाढली असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डी. के. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संकटात असलेल्या पाणबुडीला शोधून बचाव मोहीम राबविण्याची क्षमता असलेल्या निवडक देशांच्या यादीत आता भारताचा समावेश झाला आहे. अमेरिका, चीन, रशिया आणि इतर काही निवडक देशांकडेच सध्या "डीएसआरव्ही' आहे.

संकटग्रस्त पाणबुडीतील जवानांना वाचविण्याबरोबरच सागरतळाशी केबल टाकण्यासारखी कामे करण्यासाठीही या वाहनाचा उपयोग करता येऊ शकतो. आज मुंबई येथील नौदल तळावर पहिले "डीएसआरव्ही' दाखल झाल्यानंतर दुसरे वाहन पुढील वर्षी विशाखापट्टणम्‌ येथील नौदल तळावर दाखल होणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com