विशेष कौशल्यांना भविष्यात मोठ्या संधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली - देशातील रोजगाराच्या संधी मागील तिमाहीमध्ये मोठ्या प्रमाणात कमी झाल्यानंतर रोजगार शोधणाऱ्या तरुणांसाठी पुन्हा नव्या संधी निर्माण होणार आहेत. ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तिमाहीत भारत कुशल कर्मचाऱ्यांसाठी जगातील तिसऱ्या क्रमांकाची आशादायी बाजारपेठ बनेल, असे एका पाहणीतून समोर आले आहे. 

नवी दिल्ली - देशातील रोजगाराच्या संधी मागील तिमाहीमध्ये मोठ्या प्रमाणात कमी झाल्यानंतर रोजगार शोधणाऱ्या तरुणांसाठी पुन्हा नव्या संधी निर्माण होणार आहेत. ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तिमाहीत भारत कुशल कर्मचाऱ्यांसाठी जगातील तिसऱ्या क्रमांकाची आशादायी बाजारपेठ बनेल, असे एका पाहणीतून समोर आले आहे. 

मनुष्यबळ सल्लागार कंपनी ‘मॅनपॉवर ग्रुप’ने ही पाहणी केली आहे. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तिमाहीत रोजगारातील वाढ १२ टक्के कमी राहणार असली, तरी ती मागील तिमाहीच्या तुलनेत पाच टक्के अधिक असेल, असे पाहणीतून समोर आले आहे. नोटाबंदी आणि जागतिक पातळीवरील मंदीमुळे भारतात रोजगारातील वाढ कमी झाली आहे. जुलै ते सप्टेंबर २०१६ या तिमाहीत रोजगारातील वाढ ३५ टक्के होती. त्यानंतर त्यात घसरण होण्यास सुरवात झाली. रोजगारातील वाढ ऑक्‍टोबर ते डिसेंबर २०१३ या तिमाहीत ३१ टक्के, जानेवारी ते मार्चमध्ये २३ टक्के, एप्रिल ते जून २०१७ मध्ये १७ आणि जुलै ते सप्टेंबर २०१७ मध्ये १४ टक्‍क्‍यांवर आली. ‘मॅनपॉवर ग्रुप’ने रोजगार पाहणीमध्ये देशभरातील ५ हजार ५ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यांना पुढील काळात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधीबाबत विचारणा करण्यात आली होता. पाहणी अहवालानुसार, जपान आणि तैवाननंतर रोजगाराच्या आशादायी वातावरणामध्ये भारत तिसऱ्या स्थानी आला आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत भारताने अन्य देशांपेक्षा चांगली प्रगती केली आहे. केवळ सिंगापूरची प्रगती भारताच्या प्रगतीच्या तुलनेत अधिक असून, सिंगापूर सहाव्या स्थानी आला आहे. 

रोजगाराच्या संधी आणि रोजगाराच्या शोधात असणारे यांच्यात कौशल्याचा घटक महत्त्वाचा ठरत आहे. रोजगारासाठी आवश्‍यक कौशल्ये असलेला उमेदवार शोधणे अवघड जात आहे. उद्योगांविषयी माहिती आणि प्रत्यक्ष कामातील गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना तिसऱ्या तिमाहीत चांगली संधी आहे.

२०२० पर्यंत ही असतील रोजगाराची क्षेत्र 
व्हीएफएक्‍स आर्टिस्ट  कॉम्प्युटर व्हिजन इंजिनिअर 
वायरलेस नेटवर्क स्पेशालिस्ट  एम्बेडेड सिस्टिम प्रोग्रॉम 
ऑटोमोबाईल ॲनालिटिक्‍स इंजिनिअर  डेटा सायंटिस्ट 
डेटा आर्किटेक्‍ट  आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च 
मशिन लर्निंग बेस्ड  ३डी प्रिटिंग टेक्‍निशियन 
व्हेइकल सायबरसिक्‍युरिटी एक्‍स्पर्ट 
सस्टेनाबिलिटी इंटिग्रेशन एक्‍स्पर्ट

Web Title: new delhi national news Future big opportunities for special skills