आधार कार्ड जोडणीच्या मुदतवाढीवर शिक्कामोर्तब

आधार कार्ड जोडणीच्या मुदतवाढीवर शिक्कामोर्तब

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाची मान्यता

नवी दिल्ली: विविध सेवा आणि कल्याणकारी योजनांना आधार कार्ड जोडण्याची मुदत पुढील वर्षी 31 मार्चपर्यंत वाढविण्यावर सर्वोच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केले.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठाने आपल्या अंतरिम आदेशामध्ये आधारला मोबाईल सेवेशी जोडण्याच्या संदर्भातील आपल्या पहिल्या आदेशातही सुधारणा करताना त्याचीही मुदत वाढवली. बॅंकेत नवीन खाते उघडण्यासाठी अर्जदाराने बॅंकेला आधार क्रमांक देण्याची आवश्‍यकता नसल्याचेही न्यायाधीश ए. के. सिक्री, न्यायाधीश ए. एम. खानविलकर, न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायाधीश अशोक भूषण यांचा समावेश असलेल्या घटनापीठाने स्पष्ट केले.

सर्वसहमतीने अंतरिम आदेश लिहिणारे न्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले, की बॅंक खाते उघडताना अर्जदाराला त्याने आधार क्रमांकासाठी अर्ज केल्याचा पुरावा मात्र सादर करावा लागेल. आधारसंबंधीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर घटनापीठ 17 जानेवारीपासून सुनावणीला सुरवात करेल, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

मोबाईल क्रमांकासाठीही मुदतवाढ
आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी जोडण्याची शेवटची तारीख 6 फ्रेब्रुवारी 2018 वरून वाढवून 31 मार्च 2018 करण्यात येत असल्याचे घटनापीठाने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com