'आप'चे बारा आमदार दिल्ली उच्च न्यायालयात

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

लाभाच्या पदासंबंधीच्या "ईसी'मधील सुनावणीला विरोध

नवी दिल्ली : लाभाचे पद कथितरित्या सांभाळण्याच्या प्रकरणात सुनावणी सुरू ठेवण्याच्या निवडणूक आयोगाच्या (ईसी) निर्णयाविरुद्ध आम आदमी पक्षाच्या (आप) 12 आमदारांच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने आज आयोगाला उत्तर देण्यास सांगितले.

न्यायाधीश इंद्रमित कौर यांनी आयोगाला नोटीस जारी केली आणि आपच्या आमदारांच्या याचिकांवर उत्तर द्यायला सांगितले. उच्च न्यायालयाने आमच्या नियुक्‍त्या घटनाबाह्य ठरवताना त्याकडे दुर्लक्ष केले असताना, आयोगाने या प्रकरणाची सुनावणी सुरूच ठेवण्याची कोणतीही आवश्‍यकता नसल्याचा दावा याचिकांमध्ये करण्यात आला आहे.
न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे, की याचिकाकर्ता या टप्प्यावर आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची विनंती करत नाहीत. कारण आयोगाने सुनावणीची कोणतीही पुढील तारीख दिलेली नाही. जर आयोगाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी तारीख निश्‍चित केल्यास याचिकाकर्ते त्याला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल करू शकतात. न्यायालयाने या याचिकांवरील सुनावणीसाठी 21 नोव्हेंबर ही तारीख निश्‍चित केली आहे.