'बेटी बचाओ' मोहिमेचे रूपांतर "बेटा बचाओ'मध्ये: राहुल गांधी

वृत्तसंस्था
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

नवी दिल्ली  ः ""केंद्र सरकारने "बेटी बचाओ' मोहिमेचे रूपांतर "बेटा बचाओ'मध्ये केले आहे,'' अशा शब्दांत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज भाजपवर टीकास्त्र सोडले.

सत्ता मिळताच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय यांच्या कंपनीची उलाढाल वाढल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. याप्रकरणी अनेक केंद्रीय मंत्री जय शहा यांच्या समर्थनासाठी धावून आले आहेत. त्यावर गांधी यांनी ट्‌विटच्या माध्यमातून टीका केली. ट्‌विटरवर त्यांनी शहा यांच्या मुलाचा उल्लेख "शहजादा' असा करून "बेटी बचाओ' मोहिमेचे "बेटा बचाओ'मध्ये झालेले रूपांतर थक्क करणारे असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, आपल्या गुजरात दौऱ्यात आज गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीकेची धार आणखी वाढविली. कर्जन येथील सभेत बोलताना त्यांनी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय यांच्या प्रकरणात मोदीजी भागीदार आहेत का, असा सवाल केला. मोदींवर टीका करताना ते म्हणाले, ""चौकीदाराच्या समोर चोरी झाली. मग प्रश्‍न पडतो की तुम्ही चौकीदार आहात की भागीदार.''

सरकारने "बेटी बचाव, बेटी पढाव' या योजनेचे नाव बदलून "अमित शहा के बेटे को बचाव' असे ठेवावे, अशा शब्दांत त्यांनी शहा यांची बाजू घेणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांवर टीका केली. ते म्हणाले, ""शहा यांची कंपनी सहा-सात वर्षांपूर्वी स्थापन झाली. 2014 पर्यंत ती कोठेच नव्हती; पण भाजप सत्तेवर येताच कंपनीची उलाढाल पन्नास हजारांवरून 80 कोटी झाली. नोटाबंदी, जीएसटीचा फटका सर्व लघुउद्योगांना बसला; पण या कंपनीला नाही. कंपनीला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या नेतृत्वाखालील मंत्रालयाने कर्ज दिले. 2016 मध्ये ही कंपनी बंद झाली. यावर पंतप्रधान गप्प का आहेत.''

संघाच्या शाखांत किती महिला दिसतात?
बडोदा ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप महिलांना अजिबात महत्त्व देत नाहीत. संघाच्या शाखांत किती महिला दिसतात, अशी टीका राहुल गांधी यांनी आज येथे विद्यार्थ्यांसमोर बोलताना केली. ते म्हणाले, ""कॉंग्रेसमध्ये याच्या उलट आहे. येथे सर्व स्तरांत महिला काम करताना दिसतात. महिला जोपर्यंत गप्प आहेत तोपर्यंत चांगली अशी भाजपची धारणा आहे. जेव्हा त्या बोलू लागतात तेव्हा त्यांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न ते करतात. रा. स्व. संघात किती महिला आहेत.'' तुम्ही "शॉर्टस' परिधान केलेली महिला कधी संघाच्या शाखेत पाहिलीय का, असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.