मुख्यमंत्री आदित्यनाथ हे निरुपयोगी : राहुल गांधी

वृत्तसंस्था
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

पर्यटनातून ताज महालचे नाव वगळल्याने टीका

नवी दिल्ली: जगातील सात आश्‍चर्यांमध्ये समाविष्ट असलेला "ताज महाल'ला उत्तर प्रदेशच्या पर्यटन स्थळांच्या यादीत स्थान देण्यात आलेले नाही. याचा समाचार कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतला. "उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे निरुपयोगी सत्ताधारी असून ते राज्याला अंधारात ढकलत आहेत,'' अशा शब्दांत त्यांनी मंगळवारी भाजप सरकारवर टीकेची झोड उठविली.

उत्तर प्रदेशच्या सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना राहुल यांनी ट्‌विटरवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सूर्याला दिव्याचा उजेड दाखविला नाही तरी त्याची चमक कमी होत नाही. तसेच असे राज्याचे वर्णन कवी भारतेंदू हरिश्‍चंद्र यांनी "अंधेर नगरी चौपट राजा' असे केले आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या पर्यटन विभागाने राज्यातील पर्यटन स्थळांची माहिती देणारी "अपार संभावनाएँ' या शीर्षकाच्या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन सोमवारी (ता.2) केले. मात्र त्यातून ताज महालचे नाव वगळण्यात आले आहे. या पुस्तिकेत नमूद केलेली पर्यटन स्थळे ही हिंदू धर्माशी निगडीत आहेत. यात आदित्यनाथ यांचा मतदारसंघ असलेल्या गोरखपूरमील मंदिराचाही समावेश आहे.

त्यावर आता वाद उफाळून आला असून, राहुल गांधी यांच्यासह विविध पक्षाकडून टीका सुरू झाली आहे. आदित्यनाथ यांचे सरकार जातीयवादी असल्याचे म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वी बिहारमधील एका सभेत बोलताना आदित्यनाथ यांनी "भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब ताज महालमधून उमटत नाही. मात्र रामायण व भगवत गीतेतून ते दिसते,' असे वक्तव्य केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर या पुस्तिकेत ताज महालचे नाव वगळण्यात आले आहे.