हलक्‍या पावसाने केली दिल्लीकरांची 'सुटका'

हलक्‍या पावसाने केली दिल्लीकरांची 'सुटका'

नवी दिल्ली: राजधानी नवी दिल्लीच्या अनेक भागांत काल रात्रीपासून झालेल्या हलक्‍या पावसाने नोव्हेंबरच्या सुरवातीपासून दिल्लीकरांच्या डोक्‍यावर बसलेले "स्मॉग'चे संकट बहुतांश प्रमाणात दूर झाले. गेला महिनाभर; त्यातही मागचे दोन आठवडे अक्षरशः विषारी श्‍वासोच्छ्वास करणाऱ्या दिल्लीकरांची पावसानेच सुटका केली.

पावसामुळे दिल्ली-एनसीआर भागातील हवेचा गुणवत्ता सूचकांक आज दिवसा सर्वांत नीचांकी स्तरावर, म्हणजे 288 एचआयक्‍यू इतका राहिला. 16 ऑक्‍टोबरनंतर तो सातत्याने 300 च्या पातळीवर राहिला होता. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) आज दिल्लीचा हवा सूचकांक जारी केला. त्यानुसार घातक पार्टिकल मीटर्सचे (पीएम) प्रमाण 288 नोंदविले गेले. शुक्रवारी रात्रीपासूनच ते 299 पर्यंत घसरले होते. दिल्लीतील सर्व 17 केंद्रांतील हवामापकांनी आज सकाळी दहा वाजता केलेली ही नोंद आहे. गुडगाव, नोएडा व गाझियाबाद भागातही हीच स्थिती राहिली. राजस्थानात चक्रवाताची स्थिती व वायव्येकडून वारे वाहण्याचा वेग वाढल्याने राजधानी परिसरात ताशी 15 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. यानंतर हिमालयातील बर्फवृष्टीचे आकडे वाढत जातील तसतशी दिल्लीची हवा आणखी प्रमाणात सुधारेल. अर्थात, या मंडळाच्या म्हणण्यानुसार आगामी काळात धुक्‍याचे आक्रमण झाल्यावर हवेचे प्रदूषण पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com