संघर्षावर संवाद हाच तोडगा : पंतप्रधान मोदी

वृत्तसंस्था
रविवार, 6 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली: जगभरातील समुदायात दरी निर्माण करणाऱ्या आणि देशात व समाजात संघर्षाची बीजे रोवणाऱ्या धर्मांध आणि पूर्वग्रहदूषित विचारांशी केवळ चर्चेतूनच मार्ग काढता येतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नमूद केले. परस्परातील वाद-विवादावर आणि समस्यांवर केवळ चर्चेतूनच तोडगा काढता येतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

यंगून येथे होणाऱ्या संवाद : ग्लोबल इनिशिटिव्ह ऑन कॉन्फिट एवॉयडेंस अँड एन्वायर्न्मेंट कॉन्शियन्स'च्या दुसऱ्या सत्रात व्हिडिओ संदेशात मोदी यांनी मत मांडले. मोदी म्हणाले, की दहशतवाद ते तापमानवाढ यासारख्या जागतिक आव्हांनावर चर्चा आणि संवादाच्या माध्यमातूनच मार्ग निघू शकतो. आशियाई देशांच्या या जुन्या परंपरेनुसारच जगातील समस्या निकाली लागू शकतात, असा विश्‍वास मोदी यांनी व्यक्त केला. किचकट आणि कठीण मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी संवाद चर्चेशिवाय अन्य कोणताही मार्ग नाही. भारतीय परंपरा ही संवाद आणि चर्चेवर विश्‍वास ठेवते आणि ही प्राचीन भारतीय परंपरेची देणगी आहे. तर्कशास्त्र हे प्राचीन भारताचा सिद्धांत असून चर्चा आणि वादविवादावर आधारलेला हा सिद्धांत संघर्षापासून बचाव करण्यासाठी विचारांचे आदानप्रदान करण्याचे मॉडेल मानले जाते.

पर्यावरणासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, की मानवाने स्वत:ला निसर्गाशी जोडले पाहिजे आणि निसर्गाचा होणारा ऱ्हास थांबविण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. जर मानवाने निसर्गाचे संरक्षण केले नाही, तर निसर्ग संकटात सापडेल आणि प्रदूषणाच्या रूपातून निसर्गाची प्रतिक्रिया उमटत राहील. आधुनिक समाजासाठी पर्यावरण संरक्षण करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे, असे मोदी म्हणाले