चिनी फटाक्‍यांवर करडी नजर

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

बेकायदा आयात रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा सरसावल्या

नवी दिल्ली : दिवाळीत फटाक्‍यांच्या बेकायदा आयातीवर सरकारने करडी नजर ठेवण्यास सुरू केली असून, यामध्ये प्रामुख्याने चीनमधून होणाऱ्या फटाक्‍यांच्या आयातीची तपासणी करण्यात येत आहे. केंद्रीय उत्पादन व सीमाशुल्क मंडळाने देशभरातील सर्व सीमाशुल्क विभागांना याबाबतचे आदेश दिले आहेत.

बेकायदा आयात रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा सरसावल्या

नवी दिल्ली : दिवाळीत फटाक्‍यांच्या बेकायदा आयातीवर सरकारने करडी नजर ठेवण्यास सुरू केली असून, यामध्ये प्रामुख्याने चीनमधून होणाऱ्या फटाक्‍यांच्या आयातीची तपासणी करण्यात येत आहे. केंद्रीय उत्पादन व सीमाशुल्क मंडळाने देशभरातील सर्व सीमाशुल्क विभागांना याबाबतचे आदेश दिले आहेत.

केंद्रीय उत्पादन व सीमाशुल्क मंडळाने फटाके आयात आणि विक्रीचे परवाने या पुढे कोणालाही देण्यात येऊ नये, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. आयात फटाक्‍यांवरील बंदीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने 1992 मध्ये काढलेल्या अधिसूचनेचे पालन करावे, असेही मंडळाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच दिल्लीमध्ये फटाके विक्रीवर 1 नोव्हेंबरपर्यंत बंदी घातली आहे.
गुप्तचर महासंचालनालयानेही फटाक्‍यांची बेकायदा आयात रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. परदेशातून फटाक्‍यांची बेकायदा आयात थांबविण्यासाठी महासंचालनालय वेळोवेळी अधिकाऱ्यांना सूचना करीत आहे. तसेच, अधिकाऱ्यांना दक्षतेचे आदेश देऊन योग्य उपाययोजना आखण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. या सूचनांचे काटेकोर पालन करावे, अशी तंबीही महासंचालनालयाने दिली आहे. फटाक्‍यांच्या आयातीवर निर्बंध असून, फटाके आयात करण्यासाठी परकी व्यापार महासंचालनालयाचा परवाना बंधनकारक आहे.

स्वस्त व धोकायदायक फटाके
विदेशातून स्वस्त आणि धोकादायक फटाके आयात करण्याचे प्रयत्न होताना दिसत आहे. यामध्ये चीनमधील फटाक्‍यांचा समावेश आहे. विदेशातून फटाके निर्यात करताना ते खेळण्यांच्या नावाखाली आयात केले जातात. हे फटाके बेकायदा भारतात विकले जातात. त्यामुळे चीनमधून आयात होणाऱ्या फटाक्‍यांचे पैसे "हवाला'मार्गे दिले जातात.

आरोग्यासाठी हानिकारक
चीनमधून आयात होणाऱ्या फटाक्‍यांमध्ये गंधक आणि विषारी पदार्थांचा समावेश असतो. यामुळे पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होत असून, सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहेत. याच कारणांमुळे चीनमधून आयात होणाऱ्या फटाक्‍यांवर निर्बंध टाकण्यात आले आहेत. महसुली गुप्तचर संचालनालयाने जानेवारी महिन्यात चीनमधून आयात केलेले दहा कोटी रुपयांचे फटाके जप्त केले आहेत.