पाकिस्तानच्या मंत्रिमंडळात प्रथमच हिंदू खासदार

वृत्तसंस्था
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

दर्शन लाल यांची वीस वर्षांनंतर प्रथमच नियुक्ती

नवी दिल्लीः पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांच्या मंत्रिमंडळात हिंदू खासदार दर्शन लाल यांचा समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानमध्ये 20 वर्षांनंतर प्रथमच हिंदू नेत्याची मंत्रिपदी निवड झाली आहे.

नवाज शरीफ यांना "पनामा पेपर्स' प्रकरणातील भ्रष्टाचारामुळे अपात्र ठरविल्यानंतर त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले. त्यांनी निकटचे सहकारी शाहिद खाकन अब्बासी यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली. शुक्रवारी (ता.4) त्यांचा शपथविधी झाला. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात दर्शन लाल (वय 65) या हिंदू खासदाराचा समावेश केला आहे.

पाकिस्तानमध्ये दोन दशकांत प्रथम हिंदू खासदाराला कॅबिनेटमध्ये स्थान मिळाले आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती ममनून हुसेन यांनी एकूण 47 खासदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. त्यातील 19 राज्यमंत्री आहेत.

पाकिस्तानच्या चारही प्रांतांच्या समन्वयाची जबाबदारी दर्शन लाल यांच्यावर खाकन यांनी दिली आहे. लाल हे पेशाने डॉक्‍टर आहेत. सध्या सिंध प्रांतात मीरपूर मथेलो शहरात वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. 2013 मध्ये ते पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) पक्षाच्या तिकिटावर अल्पसंख्याक कोट्यातून दुसऱ्यांचा खासदार म्हणून निवडून आले आहेत. शरीफ यांच्या मंत्रिमंडळात सुरक्षा व ऊर्जा मंत्रालयाचा कारभार सांभाळणारे ख्वाजा आसिफ यांच्याकडे अब्बासी यांनी परराष्ट्र मंत्रालय सोपविले आहे. पाकिस्तान सरकारमध्ये 2013 पासून कोणी पूर्णवेळ परराष्ट्रमंत्री नव्हते. हीना रब्बानी खर या तेथील शेवटच्या परराष्ट्रमंत्री होत्या. आता पाकिस्तानला हिंदू मंत्र्याशिवाय परराष्ट्रमंत्रीही मिळाला आहे.