कुलभूषण जाधव यांना वकिलांची मदत द्या

वृत्तसंस्था
रविवार, 2 जुलै 2017

भारताची पाकिस्तानकडे पुन्हा मागणी

नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांना लवकरात लवकर वकिलांची मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भारताने आज पाकिस्तानकडे पुन्हा एकदा केली. पाकिस्तानमधील कारागृहात असलेल्या जाधव यांना तेथील एका लष्करी न्यायालयाने हेरगिरी आणि विस्फोटक कारवायांच्या कथित आरोपाखाली मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी एकमेकांच्या तुरुंगात बंदिस्त असलेल्या कैद्यांच्या यादीची देवाणघेवाण करताना भारताने आज पुन्हा एकदा मागणी केली. भारताला देण्यात आलेल्या पाकिस्तानच्या यादीनुसार, सुमारे 500 मच्छीमारांसह जवळपास 546 भारतीय नागरिक त्यांच्या विविध कारागृहांत बंदिस्त आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने दिल्लीत एक निवेदन जारी करताना म्हटले आहे, की हामित नेहाल अन्सारी आणि कुलभूषण जाधव यांच्यासह पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या भारतीय नागरिकांना तातडीने वकिलांची मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भारताने पुन्हा एकदा पाककडे केली आहे.