लालूप्रसाद यांच्या अडचणींत वाढ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 जुलै 2017

"ईडी'कडून आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा; कुटुंबीयांचाही समावेश

नवी दिल्ली,: संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळातील रेल्वे हॉटेल वाटप भ्रष्टाचारप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी लालूप्रसाद आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला.

"ईडी'च्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. लालूप्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारती आणि जावई शैलेश यांना त्यांच्या निवासस्थान आणि फॉर्म हाउसची कागदपत्रे सोपविण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात रेल्वेमंत्री असताना लालूप्रसाद यादव यांनी आयआरसीटीसीच्या हॉटेल कंत्राटांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे.

आयआरसीटीसीचे बीएनआर आणि सुजाता या हॉटेलांच्या दुरुस्तीच्या कामांच्या निविदांमध्ये कथितरीत्या भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) 5 जुलै रोजी लालूप्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडीदेवी, मुलगा तेजस्वी यादव आणि आयआरसीटीसीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांसह अन्य पाच जणांविरोधात एफआयआर दाखल केला होता. याच एफआयआरच्या आधारावर "ईडी'ने मनी लॉंडरिंग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने लालूप्रसाद यांच्याशी संबंधित 12 ठिकाणांवर छापेमारीही केली होती.