महाराष्ट्राला तीन राष्ट्रीय बालकल्याण पुरस्कार

ramnath kovind
ramnath kovind

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज महाराष्ट्राला 2017 साठीचे तीन राष्ट्रीय बालकल्याण पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुंबई येथील बुद्धिबळपटू जैसेल शाह व पुणे जिल्ह्यातील शांतिलाल गुलाबचंद मुथा आणि बालकांच्या लैंगिक शोषणाच्या विरोधात आवाज उठविणारी आरंभ इंडिया या संस्थेचा पुरस्कारार्थींमध्ये समावेश आहे. बालदिनानिमित्त केंद्रातर्फे हे राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात.

महिला व बालकल्याण विकास मंत्रालयातर्फे दरबार हॉलमध्ये हा सोहळा झाला. महिला व बालकल्याण राज्यमंत्री वीरेंद्र कुमार या वेळी उपस्थित होते. राष्ट्रीय बाल पुरस्कारात विशेष उल्लेखनीय प्रावीण्य, सेवाभावी संस्था आणि व्यक्तीच्या कार्याचा गौरव अशा तीन गटांतून पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली. उल्लेखनीय प्रावीण्य गटात मुंबईचा उद्योन्मुख बुद्धिबळपटू जैसेल शाह याला दहा हजार रुपये रोख, रौप्य पदक, प्रमाणपत्र व 10,000 रुपयांचे पुस्तक व्हाऊचर देण्यात आले. मुंबईतील आरंभ इंडिया ही युनेसेफशी संलग्न संस्था लौंगिक शोषणास बळी पडलेल्या बालकांचे पुर्नवसन करते. तसेच लौंगिक शोषणाबाबत प्रचार-प्रसाराचे कामही ही संस्था करते. दिव्यांग बालकांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दलचा राजीव गांधी मानवसेवा पुरस्कार पुणे जिल्ह्यातील शांतिलाल गुलाबचंद मुथा यांना प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये रोख, रजतपदक व प्रमाणपत्र असे याचे स्वरूप आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com