'मॅकडोनल्ड'ची दिल्लीतील 43 रेस्टॉरंट बंद

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 जून 2017

नवी दिल्ली: "मॅकडोनल्ड' या आंतरराष्ट्रीय साखळी फास्ट फूड कंपनीची दिल्लीत 55 रेस्टॉरंट आहे; मात्र आरोग्य विभागाच्या परवान्याची मुदत संपल्यामुळे व नवीन परवाना अद्याप न मिळाल्याने शहरातील मॅकडोनल्डची 43 रेस्टॉरंट गुरुवारपासून बंद करण्यात आली आहे.

कनॉट प्लाझा रेस्टॉरंट प्रा. लि. बोर्ड (सीपीआरएल) मधील वादाची पार्श्‍वभूमीही यासाठी कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले. उत्तर व पूर्व भारतात "सीपीआरएल'च्या अंतर्गत दिल्लीतील "मॅकडोनल्ड' रेस्टॉरंट चालविली जातात. परवान्याचे नूतनीकरण अद्याप झाले नसल्याने ही रेस्टॉरंट तात्पुरती बंद करण्याचा निर्णय बुधवारी (ता. 28) घेण्यात आला. "स्काइप'वरून झालेल्या बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय झाला.

"सीपीआरएल', विक्रम बक्‍शी आणि अमेरिकी मॅकडोनल्ड यांच्यात 50-50 टक्‍क्‍यांची भागीदारी यासाठी आहे. बक्‍शी व मॅकनोडल्ड यांच्यात कायदेशीर लढाई सुरू असून, त्यामुळे "सीपीआरएल'ला आरोग्य परवाना मिळणे अवघड झाले असल्याचे सांगण्यात आले. रेस्टॉरंट बंद झाल्याने सतराशे कर्मचारी बरोजगार होण्याची भीती व्यक्त होत आहे.