एनडीआरएफला मिळणार आणखी चार बटालियन्स: संजय कुमार

वृत्तसंस्था
रविवार, 6 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली: राष्ट्रीय आणि मानवनिर्मित आपत्तीच्या काळात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला (एनडीआरएफ) चांगले काम करता येण्यासाठी त्यांना आणखी चार बटालियन्स देण्याचा सरकार विचार करत आहे. या चार बटालियन्समधून चार हजार जवान एनडीआरएफला मिळतील, अशी माहिती एनडीआरएफचे महासंचालक संजय कुमार यांनी दिली.

जम्मू काश्‍मीर, एनसीआर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश येथे नवीन बटालियन्स उभारण्याचा सरकार विचार करत आहे. याबाबत अद्याप अंतिम निर्णय होणे बाकी आहे, असे संजय कुमार म्हणाले. एनडीआरएफला लवकर नवीन बटालियन्स देण्याचा सरकारचा विचार आहे. वास्तविक त्यासाठी 2019 ची अंतिम मुदत आहे. गुजरात, राजस्थानसह देशाच्या अनेक भागात पुराची परिस्थिती आता सामान्य होऊ लागली असून, आता कोणतीही चिंतेची गोष्ट नाही, असे ते म्हणाले. गुजरातमध्ये आलेल्या मोठ्या प्रमाणातील पुरामुळे आम्ही तेथे अधिकाधिक एनडीआरएफच्या टीम पाठविल्या होत्या; मात्र आता तेथील परिस्थिती सामान्य होत आहे. राजस्थानची परिस्थितीही चिंताजनक नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.