नोटाबंदीचा निर्णय हा आत्महत्येसारखा धाडसी: शौरी

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

अरुण शौरी यांची सरकारवर घणाघाती टीका

नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री आणि ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्यापाठोपाठ भाजपचे बंडखोर नेते अरुण शौरी यांनी केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावर कठोर शब्दांत टीका केली आहे. नोटाबंदी ही आर्थिक गैरव्यवहाराची सर्वांत मोठी योजना होती. सर्वप्रथम केंद्र सरकारने तिची संकल्पना मांडून ती अमलातही आणली, हे आत्महत्या करण्यासारखेच होते, असे सांगत त्यांनी आत्महत्येचे कृत्य हादेखील "धाडसी निर्णय'च असतो, असे विधान शौरी यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.

शौरी म्हणाले, ""नोटाबंदी हा मूर्खपणाचा झटका होता. नोटाबंदीच्या काळात प्रत्येकाने आपल्याकडील काळा पैसा पांढरा केला. खुद्द रिझर्व्ह बॅंकेनेच बंदी घातलेले 99 टक्के चलन परत आल्याचे कबूल केले आहे. यावरून काळा पैसा अथवा ज्यावर कर भरण्यात आलेला नाही तो या निर्णयामुळे नष्ट झाला नसल्याचे दिसून येते. वस्तू आणि सेवाकराची अंमलबजावणीदेखील सरकारचे गैरकृत्य आहे. हा फारसा महत्त्वाचा निर्णय नसला, तरीसुद्धा त्याची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने करण्यात आली. मागील तीन महिन्यांमध्ये या कायद्यात सात वेळा सुधारणा करण्यात आली आहे.'' देशाची महत्त्वाची आर्थिक धोरणे ठरविण्याचे काम हे अडीच लोकांकडून केले जाते. यामध्ये अमित शहा, नरेंद्र मोदी आणि संसदेतील वकिलाचा समावेश आहे. यशवंत सिन्हा यांनी काही दिवसांपूर्वी मांडलेली मते योग्यच असल्याचा दावाही त्यांनी केला.

सर्व दाव्यांचे खंडन
नोटाबंदीच्या समर्थनार्थ सरकारने केलेला कोणताही युक्तिवाद टिकाव धरू शकत नाही, तुम्ही काळ्या पैशाचा मुद्दा पुढे करणार असाल, तर तो आज पूर्ण पांढरा झाला आहे. दहशतवाद्यांची घुसखोरीही सुरूच आहे. आता शेवटी सरकारकडे सांगण्यासारखे काहीच उरलेले नाही, असेही शौरी यांनी नमूद केले. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या दाव्यांचाही त्यांनी कठोर शब्दांत समाचार घेतला.

Web Title: new delhi news nota bandi decision is bold arun shourie