पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून

वृत्तसंस्था
रविवार, 25 जून 2017

नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून सुरू होणार असल्याचे सूत्रांनी आज सांगितले. याच दिवशी राष्ट्रपतिपदासाठी मतदान होणार आहे. पावसाळी अधिवेशन 17 जुलै ते 11 ऑगस्ट यादरम्यान असावे, अशी शिफारस संसदीय कामकाजावरील मंत्रिमंडळ समितीने केली आहे.

राष्ट्रपतिपदासाठीचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी काल (ता. 23) उमेदवारी अर्ज भरल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली होती. सामान्यपणे जुलैमध्ये सुरू होणारे पावसाळी अधिवेशन यंदा राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमुळे लांबणीवर पडल्याचे सूत्रांनी सांगितले.

या निवडणुकीसाठी सर्व 776 सदस्यांनी मतदान करावे यासाठीच अधिवेशनही 17 तारखेला सुरू करण्याचे प्रयोजन असल्याचेही समजते. लोकसभा खासदार विनोद खन्ना आणि राज्यसभा खासदार पल्लवी रेड्डी या दोन विद्यमान सदस्यांचे निधन झाल्याने पहिल्या दिवशी कामकाज होण्याची शक्‍यता कमी आहे.