पंतप्रधानांनी वाहिली महात्मा गांधी, शास्त्री यांना आदरांजली

वृत्तसंस्था
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राजघाट आणि विजयघाट येथे जाऊन आदरांजली वाहिली.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राजघाट आणि विजयघाट येथे जाऊन आदरांजली वाहिली.

\पंतप्रधान मोदी यांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 148 व्या जयंतीनिमित्त आयोजित प्रार्थना सभेत सहभाग घेतला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी गाधीजींवर प्रेम करतो. त्यांच्या महान आदर्शांनी जगभरातील लाखो नागरिकांना प्रेरणा मिळाली. पंतप्रधान मोदी यांनी विजयघाटावर जाऊन माजी पंतप्रधान शास्त्री यांना 113 व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. मी कुशल नेत्यांसमोर झुकतो. शास्त्रीजींनी लष्कर आणि शेतकरी यांना प्रेरणा दिली. त्याचप्रमाणे देशाला एक सक्षम नेतृत्व दिले.