बलात्काराच्या आरोपातून दिग्दर्शक फारुखीची मुक्तता

वृत्तसंस्था
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयाने आज "पिंपली लाइव्ह' या हिंदी सिनेमाचे सहदिग्दर्शक महमूद फारुखी यांची बलात्काराच्या आरोपातून मुक्तता केली. यापूर्वी सत्र न्यायालयाने फारुखी यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली होती.

न्या. आशुतोष कुमार यांनी सत्र न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरविला. तीस वर्षांच्या अमेरिकी संशोधक महिलेवर दिल्लीतील घरी मार्च 2015 मध्ये बलात्कार केल्याचा फारुखी यांच्यावर आरोप होता. मात्र या महिलेची साक्ष विश्‍वासार्ह नसल्याने फारुखी यांना संशयाचा फायदा देत मुक्त करण्यात येत असल्याचे न्यायालयाने आपल्या 85 पानी निकालपत्रात म्हटले आहे. सध्या कारागृहात असलेल्या फारुखी यांना तत्काळ सोडण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

सत्र न्यायालयाच्या शिक्षेला फारुकी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ""अशी घटना घडलेलीच नाही. त्यामुळे संबंधित महिलेचे आरोप चुकीचे असल्याचा दावा फारुकी यांच्या वकीलांनी केला होता. फारुकी व संबंधित महिला यांच्यात 2015 पासून रिलेशनशिप होती. गुन्हा दाखल करण्याच्या आदल्या दिवशीपर्यंतचे या दोघांतील मोबाईलवरील मेसेजेस वकीलांनी पुराव्यादाखल न्यायालयात सादर केले होते.