सिंधू नदीवर पाककडून सहा धरणांचे बांधकाम

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली: सिंधू नदीवर पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये पाकिस्तानकडून चीनच्या सहकार्याने सहा धरणे बांधली जात असल्याची माहिती, केंद्र सरकारच्या वतीने आज राज्यसभेत देण्यात आली.

नवी दिल्ली: सिंधू नदीवर पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये पाकिस्तानकडून चीनच्या सहकार्याने सहा धरणे बांधली जात असल्याची माहिती, केंद्र सरकारच्या वतीने आज राज्यसभेत देण्यात आली.

या संदर्भात दिलेल्या लेखी उत्तरात केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी म्हटले आहे की, या प्रकल्प उभारणीसाठी सहकार्य करण्याचा शब्द चीनने पाकिस्तानला दिला आहे. इस्लामाबाद आणि बीजिंगसाठी फायदेशीर ठरणाऱ्या या प्रकल्पांना भारताने पाकिस्तान आणि चीनकडे आक्षेप नोंदवला आहे. या प्रकल्पांमुळे भारताच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक एकात्मतेला बाधा येत असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानने बेकायदा बळकावलेला पाकव्याप्त काश्‍मीर हा भाग भारताचाच असल्याचे भारताने अनेकदा स्पष्ट केले आहे. तरीही या भागात पाककडून सातत्याने हिंसाचाराच्या घटना घडवल्या जात आहेत.

देश

नवी दिल्ली : मागणीअभावी अर्थव्यवस्थेतील मंदी आणि त्यामुळे विकासदरावर होणारा परिणाम याची चिंता सरकारला भेडसावते आहे. त्यामुळे यावर...

07.09 AM

अहमदाबाद : सोशल मीडियातील 'विकास वेडा झालाय' या उपहासात्मक टीका मोहिमेमुळे गुजरातमधील भाजपचे सरकार; तसेच नेते अक्षरश: धास्तावले...

05.03 AM

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते धरणाचे उद्घाटन होण्यापूर्वीच तब्बल 389 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017