इराकमधील भारतीयांच्या हत्येचा कोणताही पुरावा नाही: सुषमा स्वराज

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 जुलै 2017

नवी दिल्ली, ता.26 (पीटीआय) : इराकच्या मोसुलमधून अपहरण करण्यात आलेल्या 39 भारतीयांची हत्या करण्यात आल्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्यामुळे त्यांना मृत घोषित करण्याचे पाप मी करणार नाही, असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज लोकसभेत सांगितले.

त्या म्हणाल्या की, जोपर्यंत तेथील भारतीय नागरिक मृत झाल्याचे पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत सरकार त्यांचा शोध घेतच राहील. 39 भारतीय मृत झाले असल्याचे कोणतेही पुरावे जोपर्यंत मिळत नाहीत, तोपर्यंत यासंदर्भातील फाइल बंद करणार नाही. कोणत्याही पुराव्याशिवाय त्यांना मृत झाल्याचे घोषित करण्याचे पाप करणार नाही, असे स्वराज म्हणाल्या.

इराकच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चेनंतर दोन दिवसांनी त्यांनी ही माहिती लोकसभेत दिली. मी कधीही दिशाभूल करणार नाही. दिशाभूल करून काय फायदा मिळणार आहे, हे मला विरोधी पक्षाच्या सदस्यांना विचारायचे आहे. जनतेची दिशाभूल करून माझ्या सरकारला काय फायदा मिळणार आहे, असे त्या म्हणाल्या.