तलवार यांना हजार कोटींची दलाली

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

"यूपीए' सरकारच्या कार्यकाळातील मोठा गैरव्यवहार उघड

नवी दिल्ली: आधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळातील आणखी एक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. कॉर्पोरेट मध्यस्थ दीपक तलवार यांनी एक हजार कोटी रुपयांची दलाली सरकारी व्यवहारांमध्ये मिळविल्याच्या संशयावरून ते प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आले आहेत.

"यूपीए' सरकारच्या कार्यकाळात हवाई वाहतूक आणि दूरसंचार क्षेत्रातील व्यवहारांमध्ये तलवार यांनी सरकारी अधिकाऱ्यांना मोठी लाच दिल्याचे समोर आले आहे. ठराविक कंपन्यांना या व्यवहारांमध्ये झुकते माप मिळावे, यासाठी ही लाच देण्यात आली होती. प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विदेशी विमान कंपन्यांना परवाना मिळवून देण्यात तलवार यांनी मध्यस्थी केली होती. प्राप्तिकर विभागाने तलवार यांच्या मालमत्तांवर 2016 मध्ये छापे घातले होते.
तलवार यांचे "यूपीए' सरकारमधील अनेक उच्चपदस्थांनी निकटचे संबंध होते. त्यांना 2008-09 या काळात अनेक व्यवहारांमध्ये दलाली मिळाली. केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) तत्कालीन संचालक रणजित सिन्हा यांची त्यांच्या निवासस्थानी तलवार यांनी 15 महिन्यांत 63 वेळा भेट घेतल्याचे उघड झाल्यानंतर या प्रकरणी मोठा गदारोळ उडाला होता.

राडिया प्रकरणाशी संबंध
कॉर्पोरेट मध्यस्थ नीरा राडिया यांच्या दूरध्वनी संभाषणाच्या टेपचा "सीबीआय'कडून तपास सुरू असताना तलवार यांनी रणजित सिन्हा यांच्या भेटी घेतल्या होत्या. "सीबीआय'ने केलेल्या एका प्राथमिक चौकशीत हवाई वाहतूक क्षेत्रातील व्यवहारांध्ये तलवार यांच्यासह नीरा राडिया आणि माजी हवाई वाहतूक सचिव माधवन नंबियार यांचे नाव समोर आले होते.