मल्ल्याला फरारी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू

वृत्तसंस्था
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

नवी दिल्ली: मद्यसम्राट विजय मल्ल्या याला दिल्ली न्यायालयानेही फरारी आरोपी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दिल्ली न्यायालयाने मल्ल्याला फेरा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी समन्स पाठवूनही त्याला मल्ल्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही, त्यामुळे दिल्ली न्यायालयाने मल्ल्याला फरारी घोषित करण्यासंदर्भात कारवाई सुरू केली आहे.

मल्ल्याला 18 डिसेंबर रोजी न्यायालयासमोर हजर राहण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे. मुख्य महानगरीय न्यायदंडाधिकारी दीपल शेहरावत यांनी सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) या संदर्भात योग्य पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. याआधी ईडीचे विशेष वकील एन. के. मट्टा यांनी मल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याची माहिती न्यायालयाला दिली. त्यानंतर न्यायालयाने मल्ल्याला फरारी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. ईडीने या संदर्भात विविध वृत्तपत्रांत नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती.