भारतापेक्षा पाकमधील नागरिक जास्त आनंदी!

Indians are an unhappy lot, but Pakistanis get more joyful: UN report
Indians are an unhappy lot, but Pakistanis get more joyful: UN report

नवी दिल्ली: भारतातील नागरिकांपेक्षा चीन व पाकिस्तानमधील नागरिक जास्त खूष आहेत, अशी माहिती संयुक्त राष्ट्रसंघाने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. संयुक्त राष्ट्र दरवर्षी आनंदी देशांची यादी तयार करत

असून, या यादीत पाकिस्तानने भारताला मागे टाकले आहे. 156 देशांच्या यादीत भारत 133 तर पाकिस्तान 75व्या क्रमांकावर आहे.

वर्ल्ड हॅप्पीनेसने बुधवारी (ता. 14) अहवाल प्रसिद्ध केला आहे. 2018 मधील अहवालानुसार भारत 11 क्रमांकांनी खाली आला आहे. दुसरीकडे मात्र बॉम्बस्फोट दहशतवादाचा सामना करावा लागणाऱया देशात म्हणजे

पाकिस्तानमधील नागरिक भारतापेक्षा जास्त खूष आहेत. अमेरिकेची या यादीत घसरण झाली आहे. गेल्या वर्षी यादीत अमेरिका 14 व्या स्थानी होता. यावर्षीच्या यादीत अमेरिका 18 व्या स्थानी गेला आहे.

वर्ल्ड हॅप्पीनेसने सादर केलेल्या अहवालानुसार, फिनलँड पहिल्या क्रमांकावर आहे. सामाजिक पाठिंबा, भ्रष्टाचारसारखे मुद्दे लक्षात घेऊन सोबतच लोकांच्या अपेक्षा यावरुन हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

पाकिस्तानच नव्हे तर बांगलादेश, भुतान, नेपाळ, श्रीलंका व चीनमधील नागरिक हे भारतापेक्षा जास्त खूष आहेत, असे अहवालात म्हटले आहे.

फिनलॅंडच्या रहिवासी असलेल्या सोफिया होल्म (वय 24) म्हणाल्या, आमच्या देशातील राजकीय परिस्थिती व आर्थिक व्यवस्था उत्तम असल्यामुळे येथील नागरिक जास्त खूष आहेत.

टॉप 10 देश पुढीलप्रमाणेः
फिनलँड, नॉर्वे, डेनमार्क, आइसलँड, स्वित्झलँड, नेदरलँड, कॅनडा, न्यूझिलंड, स्वीडन व ऑस्ट्रेलिया.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com