पत्नीच्या नातेवाइकांनी केली नवविवाहित पुरुषाची हत्या 

पीटीआय
मंगळवार, 29 मे 2018

पत्नीच्या नातेवाइकांनी पाठविलेल्या एका टोळीने नवविवाहित पुरुषाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची घटना कोल्लम जिल्ह्यातील थेनमाला येथे घडल्याची माहिती पोलिसांनी आज दिली. जिल्ह्यातील मन्नानम भागातून पत्नीच्या नातेवाइकांनी या 23 वर्षीय नवविवाहित पुरुषाचे अपहरण करून हत्या केल्यानंतर त्याच्या नातेवाइकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले.

कोट्टायम, तिरुअनंतपुरम : पत्नीच्या नातेवाइकांनी पाठविलेल्या एका टोळीने नवविवाहित पुरुषाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची घटना कोल्लम जिल्ह्यातील थेनमाला येथे घडल्याची माहिती पोलिसांनी आज दिली. जिल्ह्यातील मन्नानम भागातून पत्नीच्या नातेवाइकांनी या 23 वर्षीय नवविवाहित पुरुषाचे अपहरण करून हत्या केल्यानंतर त्याच्या नातेवाइकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले.

केविन जोसेफ असे मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव असून, पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला. केविनच्या अपहरणाबद्दल त्याच्या पत्नीने काल पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केला. कोल्लम जिल्ह्यातील थेनमालापासून 20 किमीवर असलेल्या चालियाक्करा येथे केविनचा मृतदेह आढळून आला. 

Web Title: Newly married man in Kerala abducted and murdered