लष्कराच्या कॅम्पवर हिमस्खलन; 5 जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
बुधवार, 25 जानेवारी 2017

सोनमर्ग येथे असेल्या लष्कराच्या कॅम्पवर हिमकडा कोसळल्या. या दुर्घटनेत पाच जवान हुतात्मा झाले असून, चार जवान बेपत्ता आहेत.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील सोनमर्ग येथे लष्कराच्या कॅम्पवर झालेल्या हिमस्खलनामुळे पाच जवान हुतात्मा झाले असून, चार जण बेपत्ता आहेत.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यात होत असलेल्या तुफान हिमवृष्टीमुळे ही घटना घडली आहे. सोनमर्ग येथे असेल्या लष्कराच्या कॅम्पवर हिमकडा कोसळल्या. या दुर्घटनेत पाच जवान हुतात्मा झाले असून, चार जवान बेपत्ता आहेत. बेपत्ता जवानांचा शोध घेण्यात येत आहे.

दुसरीकडे बंदीपुरा येथेही हिमस्खलनाची घटना घडली आहे. एका घरावर झालेल्या हिमस्खलनात चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये हबीहुल्लाह (वय 50), अझीझी (वय 48), गुलशन बानो (वय 19) व इरफान (वय 17) यांचा समावेश आहे. काश्मीर खोऱ्यात गेल्या गुरुवारपासून हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद आहे.