नितीश कुमरांकडून 25 जागांची मागणी

Nitish Kumar demands 25 seats
Nitish Kumar demands 25 seats

पाटणा : कर्नाटक विधानसभा आणि उत्तर प्रदेशातील कैराना व नूरपुर पोटनिवडणूकीत भाजपला पराभव पत्करावा लागला.  भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांची एकजूट सुरू आहे. या दबावाचा फायदा घेऊन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राष्ट्रीय जनता दल युनायटेड पक्षाने (जेडीयू) आपले फासे टाकण्यास सुरूवात केली आहे. विरोधकांच्या एकजूटीच्या फायदा घेत 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत 40 पैकी 25 जागांची मागणी जेडीयूने केली आहे. परंतु, नितीश कुमार यांना 15 जागा मिळणेही अवघड आहे. 

2009 च्या आधी बिहारमध्ये जेडीयू मोठ्या भावाची भूमिका बजावत होता. तेव्हा जेडीयू 25 आणि भाजप 15 जागा लढवत होते. परंतु, 2013 मध्ये जेडीयू आणि भाजपची युती तुटली. या निवडणूकीत 15 जागांवर लढणाऱ्या भाजपचे 22 खासदार निवडूण आले होते. त्याचवेळी जेडीयूचे केवळ 2 खासदार निवडूण आले होते.
  
बिहार लोकसभेत 40 पैकी भाजप+एलपीजी+आरएलएसपी या आघाडीकडे एकूण 31 जागा आहेत. त्यातल्या 22 जागा एकट्या भाजपच्या आहेत. रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला 6 आणि उपेंद्र कुशवाहांच्या राष्ट्रीय लोकसमता पक्षाकडे 3 खासदार आहेत. जेडीयू कडे केवळ 2 खासदार आहेत. भाजपकडे जेडीयूला देण्यासाठी केवळ 9 जागा शिल्लक राहत आहेत. त्यामुळे 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत जेडीयूला 15 जागा मिळणेही अवघड आहे.

बिहार कोणत्या पक्षाचे किती खासदार
बीजेपी    22
एलजेपी    06
आरएलएसपी    03
जेडीयू    02
आरजेडी    04
कांग्रेस    02
एनसीपी    01
एकूण    40

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com