ज्येष्ठ नागरिकांना आधारसक्ती नाही

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

आधार कार्ड रेल्वे तिकिटांवर सवलत मिळविण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना बंधनकारक करण्यात आलेले नाही. ज्येष्ठ नागरिकांची माहिती जमा करण्याचे काम रेल्वेकडून सुरू आहे, अशी माहिती सरकारने लोकसभेत बुधवारी दिली.

नवी दिल्ली - आधार कार्ड रेल्वे तिकिटांवर सवलत मिळविण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना बंधनकारक करण्यात आलेले नाही. ज्येष्ठ नागरिकांची माहिती जमा करण्याचे काम रेल्वेकडून सुरू आहे, अशी माहिती सरकारने लोकसभेत बुधवारी दिली.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले, ""रेल्वे तिकिटांवरील सवलतींसाठी ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्ड बंधनकारक करण्यात आलेले नाही. देशभरातील ज्येष्ठ नागरिकांची माहिती रेल्वे जमा करीत आहे. यात आधारच्या माहितीचाही वापर करण्यात येत आहे. तसेच, व्यक्तिगत पातळीवरही ही माहिती जमा करण्याचे काम 1 जानेवारीपासून सुरू झालेले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सवलती अन्य कोणी वापरू नयेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बनावट नावे आणि खोटी माहिती देऊन ज्येष्ठ नागरिकाच्या सवलती घेण्याचे प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.''

""रेल्वेकडून "कॅशलेस' तिकिट नोंदणीला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र, सद्यपरिस्थितीत आम्ही "लेस कॅश' व्यवहार करण्यावर भर देत आहोत. यासोबत रेल्वे प्रशासन गतिमान करण्यासाठी अनेक उपाययोजना करीत आहे,'' असे त्यांनी नमूद केले.

Web Title: No AADHAR compulsion for senior citizens