मेघालयमध्ये गोमांसावर निर्बंध नाहीत: भाजप

वृत्तसंस्था
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

केंद्र सरकारने मेघालयमध्ये गोमांसावर बंदी घातलेली नाही. पूर्वेकडील राज्यात गोमांसाबाबत बनविण्यात आलेला कायदा लागू करण्यात आलेला नाही. पशुंबाबत राज्य सरकारने निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे राज्यात गोमांसावर निर्बंध लागू शकत नाहीत. 

शिलाँग - मेघालयमध्ये गोमांसावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत, असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मेघालयमध्ये पुढीलवर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी भाजपने गोमांसाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. तसेच भाजपने काँग्रेसवर आरोप करत काँग्रेस गोमांसाच्या मुद्द्यावरून नागरिकांना संभ्रमित करत असल्याचे म्हटले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष शिबुन लिंगदोह यांनी सांगितले, की केंद्र सरकारने मेघालयमध्ये गोमांसावर बंदी घातलेली नाही. पूर्वेकडील राज्यात गोमांसाबाबत बनविण्यात आलेला कायदा लागू करण्यात आलेला नाही. पशुंबाबत राज्य सरकारने निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे राज्यात गोमांसावर निर्बंध लागू शकत नाहीत.